शिवराज पटेकरी ( बी.कॉम भाग I )
आवड आहे गं, तू माझ्या मनासाठी,
पारख लाय मी हीरा, तो फक्त माझ्यासाठी,
पसंत आहे माझी तू, कोणी नाकारू शकत नाही,
बनलो आहोत आपण, फक्त एकमेकांसाठी.
आय लाईक सो मच, टाइम प्लीज माझ्यासाठी.
पाहून तुझी किमया, फेसबूक सर्च गं, केलं
लाखात एक जणू तू, गुगल इंजिन बंद झालं
पहिल्या नजरेत पाहताच, प्रेम तुझ्यावर ग केलं,
हिरा सापडून सुद्धा, हृदय माझं गहान राहिलं,
दिसायलाही दिसतेस तू रघुची मैना,
बघ जरा राघूकडे, काय झालीया दैना,
जीव व्याकुळ झाला ग सखे, तो फक्त तुझ्यासाठी,
आय लाईक सो मच, टाइम प्लीज माझ्यासाठी.
येत नाहीस तू, पाखरू पाहते गं वाट,
रोज मोजतोय मी, दिवस झालेत गं आठ,
आठवण येते तुझी, मी जेव्हा वर्गात ग जातो.
दिसशील म्हणून, रोज शोधूनी पाहतो,
आज पण आली नाही बघती, मन माझं सांगत
वर्गात असतो मी, पण मन तुझ्या आठवणीत रमतं,
एक विचारू? सांग मला, तडफड माझी कशासाठी,
आय लाईक सो मच, टाइम प्लीज माझ्यासाठी.
असशील ग तू , जगाला ग ताप
कितीही मार मनाला, तुझ्या सात खूप माफ
जेव्हाही येथेस तू, नजर तुझी हटके,
दिल मर जायेगा मेरा, जरा होश संभालके,
आवाज ऐकून तुझा मिळते गं, मुक्ती,
दिवाना आहे तुझा, दिल दे माझ्यासाठी,
न येऊन तू रोज रोज मारते,
एक सांग तरी, माझ्यावाचून कसे ग करमते,
प्रेम करतो तुझ्यावर, दुनिया तुझ्या माझ्यासाठी,
आय लाईक सो मच, टाइम प्लीज माझ्यासाठी,

No comments:
Post a Comment