Saturday, September 1, 2018

पुरातन वस्तू व वास्तू संवर्धनातून पर्यटनाचा विकास शक्य : डॉ. माया पाटील

पुरातन वस्तू व वास्तू संवर्धनातून पर्यटनाचा विकास शक्य : डॉ. माया पाटील
इतिहास हा भावनेपेक्षा बुध्दी व पुराव्यावर चालणारा विषय आहे. या पुराव्यांचा अभ्यास म्हणजे पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास होय. पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास हा बंंद खोलीत करायचा नसून, तो प्रत्यक्ष साईट निवडून उत्खनन करून करायचा असतो. पुरातत्वशास्त्रातून मानवी संस्कृतीचा, उत्क्रांतीचा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, दस्तऐवज शोधला जातो. म्हणून ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंचे संवर्धन करून त्यातून पर्यटनाचा विकास करता येतो असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांनी केली. त्या श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाने आयोजित केलेल्या पुरातत्त्वशास्त्र आणि पर्यटन याविषयावर त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. बी. पवार होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, आपण  आपल्याकडे सापडणार्‍या मुर्ती, शिलालेख इतर वस्तूंकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. यातून पर्यटनाच्या विकासातून विविध प्रकारची रोजगार निर्मिती होते. ऐतिहासिक वस्तूंची व वास्तूंचा संवर्धन करण्याची सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने उचलली पाहिजे. तरच पर्यटन विकास होऊ शकतो. यावेळी संस्था समन्वयक राहुल शहा म्हणाले की, मंगळवेढ्यात सुध्दा धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाला आणि त्यातून हॉटेलिंग व इतर रोजगार निर्मितीला खूप वाव आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एन. बी. पवार म्हणाले की, दामाजी कॉलेज सोलापूर विद्यापीठाच्या सहकार्याने पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचारात असून ज्ञानाचा वापर व्यवहारामध्ये केल्याने रोजगार निर्मिती होऊ शकते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक माने यांनी केले. सुत्रसंचालन भारत मुढे, प्रमुख पाहुण्यांची ओळख अनुपमा पाटील तर आभार सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी संस्था सचिव अ‍ॅड रमेश जोशी, किसन गवळी सोलापूर विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागातील व श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जावेद तांबोळी, प्रा. अमर माने, प्रा. रोहिनी शिंदे, प्रा. महेश घाडगे यादींने परिश्रम घेतले. यावेळी डॉ. माया पाटील यांनी दामाजी महाविद्यालयाने जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली.









No comments:

Post a Comment

श्री.संत दामाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सूवर्ण पदक

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत श्री....