Saturday, August 25, 2018

कुस्ती स्पर्धेत श्री संत दामाजी महाविद्यालयाचे यश


कुस्ती स्पर्धेत श्री संत दामाजी महाविद्यालयाचे यश
  दिनांक÷24 व 25 आँगस्ट रोजी एस.बी.पी  काॅलेज मंद्रुप येथे झालेल्या सोलापूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालय कुस्ती स्पर्धेत श्री संत दामाजी महाविद्यालयातील बी.ए भाग 1 अमर राजाराम शिदें यांने 77 किलो वजन गटात गिक्रो रोमन कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची हरीयाणा येथे होणार्या आॅल इंडिया कुस्ती संघात निवड झाली आहे.  त्याच्या या यशाबद्दल श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री अजित शहा  उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील  सचिव किसन गवळी  अॅड रमेश जोशी  खजिनदार बाळकिशन मर्दा   डाॅ . मोहन कुलकर्णी.  डाॅ. अशोक सुरवसे.  यादवराव आवळेकर रतनचंद शहा बॅकेचे चेअरमन राहुल शहा प्राचार्य डॉ. एन.बी. पवार जिमखाना कमिटीचे सदस्य  सर्व प्राध्यापक यांना अभिनंदन केले. या खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डाॅ  सतिश रायबान व कनिष्ठ विभागचे क्रीडा शिक्षक प्रा. शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
अमर राजाराम शिंदे

Friday, August 24, 2018

महाविद्यालयात वैद्यकीय शिबीर संपन्न

श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय आणि शिर्के मॅटरनिटी  होम यांच्या
संयुक्त विद्यमाने श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेची  थीम “कम्प्रेशन ओनली लाइफ सपोर्ट” ही होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री राहुल शहा (चेअरमन, रतनचंद शहा बँक) यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सौ मंजुषा शहा( भुलतज्ञ  सोलापूर) यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कम्प्रेशन या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर कुरुलकर, डॉ. शाकिर सय्यद, डॉ. मुकुंद महाजन, डॉ. शरद शिर्के, डॉ.  एस के मर्दा. आणि डॉ. आर .एम. जाधव, डॉ.विवेक निकम हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन.बी पवार यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , कार्यालयीन कर्मचारी आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे  तांत्रिक सहाय्य प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी, डॉ. जावेद तांबोळी आणि प्रा.शब्बीर शेख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गवळी डी.बी यांनी केले तर  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एन.आर जगताप यांनी केले.
कार्यक्रमाची निवडक क्षणचित्रे


"कम्प्रेशन ओनली  लाइफ सपोर्ट" या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत असताना मा.राहुलजी  शहा, मा.किसन गवळी(मामा), मा. रमेश जोशी (वकील साहेब), डॉ.एन.बी.पवार(प्राचार्य), डॉ.प्रीती शिर्के, डॉ.शरद शिर्के,डॉ. राजेंद्र जाधव,  डॉ. शाकिर सय्यद अन्य पाहुणे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.सौ.प्रीती शिर्के



कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी वर्ग 

डॉ.मंजुषा शहा मार्गदर्शन करीत असताना

कार्यक्रमास उपस्थित वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग 

कम्प्रेशनचे प्रात्यक्षिक सादर करीत असताना डॉ. राजेंद्र जाधव व डॉ.मंजुषा शहा 

डॉ,एन.बी,पवार मार्गदर्शन करताना 

विद्या विकासचे समन्वयक मा. राहुल शहा यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करताना मा.डॉ.शरद शिर्के.

Wednesday, August 22, 2018

आनोखी वारी पंढरीच्या दारी


श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून वृद्धाश्रमास १०० किलो ज्वारी दान*

मंगळवेढा- येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील इयत्ता ११ वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास १०० किलो ज्वारीचे दान करण्यात आले प्रारंभी श्री विठ्ठलाच्या मुर्तीचे पुजन वृध्द माता पित्यांच्या हस्ते करण्यात आले इयत्ता ११ वीच्या मराठी पाठयपुस्तकातील मंगेश तेंडूलकर यांच्या प्रिय बाबा या व्यक्तीचित्रणात्मक पाठाखालील असणाऱ्या उपक्रमासाठी तसेच विदयार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच सामाजिक जाणीव निर्माण व्हावी व आई वडीलांचा सांभाळ हा विचार मनामध्ये रूजावा याकरिता प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी मातोश्री वृध्दाश्रम भेटीचे आयोजन केलेले होते  यावेळी मुलाबाळाशिवाय वृध्दाश्रमात आपले उर्वरीत आयुष्य जगत असणाऱ्या श्रीकांत देशपांडे व सुनंदा छत्रे या जेष्ठांनी आमच्यावर वृध्दाश्रमात येण्याची वेळ का आली याबद्दल आपले अनुभव विदयार्थ्यांना सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या धान्याचा घास खरोखरचं गोड लागेल असे सांगून मुले आमच्यापर्यंत आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या खरं तरं आज पैशाच्या श्रीमंतीपेक्षा आई वडीलांची श्रीमंती महत्वाची आहे यासाठी निराधार वयोवृध्दांना आधार देण्याची काळाची गरज आहे हे ओळखून दामाजी महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी आपला एक घास वृध्दांसाठी यामधून ज्वारीचे दान करून अनोखी वारी घडविलेली आहे याप्रसंगी प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी आपल्या मनोगतातून आई वडील जवळ असण्याचे महत्व व संस्काराची गरज याचे महत्व पटवून दिले या उपक्रमावेळी मुलांनी अगदी जवळ बसून प्रत्येक जेष्ठांशी संवाद साधला यावेळी सर्व वृध्दांनी मुलांना भरपूर शिका,आई वडीलांचा सांभाळ करा,चांगला माणूस बना अशाप्रकारचा आशिर्वाद दिला वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक राक्षे सरांनी श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार मानले यावेळी सर्व मुला मुलींनी आम्ही जीवंत असेपर्यंत आई- वडील व सासू-सासऱ्यांची चांगली सेवा व पालनपोषन करण्याची शपथ देऊन उपक्रमाचा समारोप करण्यात आला पाठयपुस्तकात असणाऱ्या आगळ्या वेगळ्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी केल्याबद्दल व रेणुका कणासे,अफरीन शेख,करिना कांबळे,शुभांगी पाटील,रोहिणी दवले,सोनाली दवले,विशाखा दवले,काजल वाघमारे,सोनाली अवघडे,आरती अवघडे,प्रज्ञा काळूंगे,संध्या होवाळ,शितल शिंदे,स्वप्निल इंगळे,अमीर पटेल,स्वप्निल भिंगे,अरविंद शिवशरण,सचिन गायकवाड,अनिल रेवे,परमेश्वर खराडे,प्रमोद माळी,संजय सावंत,ऋतुराज लोखंडे,रोहित मेटकरी,रोहित ढावरे,रितेश कौंडूभैरी,सिध्दाराम कपले,किरण वाघमारे,अक्षय बळछत्रे,प्रविण कांबळे आदी विदयार्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल  संस्थेचे समन्वयक राहूल शहा,सर्व पदाधिकारी,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



श्री संत दामाजी महाविद्यालयातील इयत्ता ११ वी कला या वर्गातील विद्यार्थ्यांकडून एकादशीचे औचित्य साधून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन १०० किलो (१ पोते ) ज्वारी दान करण्यात आली

Sunday, August 19, 2018

व्वा रे सोशल मिडिया कहरच केला की ...

व्वा रे सोशल मिडिया कहरच केला की ...
डॉ .जावेद तांबोळी , 
 श्री .संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा .


सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत एक आभासी जग आपल्या भोवती सतत असतं ते म्हणजे सोशल मीडिया , वास्तविक किती अन खोटं किती यांचा कसलाही विचार न करता आलेली पोस्ट शंभर ग्रुप वरती फॉरवर्ड काही लोक करत राहतात ,(त्यांना आपण  सोशिक म्हणूयात )त्यांचे नेमके काय परिणाम होतील याचं जराही विचार ही लोक करत नाहीत , आली पोस्ट की मार रट्टा हीच यांची खासियत , अफवेचे पीक किती जोमात वाढेल याची काही खात्री नाही ,  वेगवेगळ्या अफवा भुताटकी पासून देवाला सुद्धा हे शोषिक सोडत नाहीत.  कधी कधी वाटतं पूर्वीचा  टेलिफोन लाख पटीने बरा होता गरजेपुरते बोलणं होतं ,गल्लीत एखादा टेलिफोन असला तरी माणुसकीने फोन येणाऱ्या व्यक्तीला बोलवलं जायचं आणि लांब असलेली नात्याला अधीक घट्ट बनवलं जायचं .आज सर्वांच्या सोयीसाठी जरी प्रत्येकाजवळ  मोबाइल तरी  मदत करण्यापेक्षा  अडचणीतल्या लोकांचे व्हिडीओ काढण्यात हे नवीन शोषिक व्यस्त असताना दिसतात . नेमकं काय चित्रीकरण करावं ,कुठले फोटो टाकावेत याचं लोकजागृती करण्याची खरंच वेळ आलेली दिसते ,आपण शोषल मीडियाचा वापर कसा आणि किती करावा याचीही लोकजागृती होणें गरजेचं आता वाटू लागलिय .नुकताच जो अमानुष प्रकार धुळे जिल्ह्यात झाला त्यानें तर कोर्याची सीमाच गाठली .पोट भरण्यासाठी  बाहेर पडलेल्या , पारंपरिक व्यवसाय अथवा रोजगारच्या  शोधात बऱ्याच भारतीयांना एका ठिकणा हुन दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागते परंतु शोषिकामुळे त्यांनीं पसरवलेल्या अफवामुळे आता पारंपरिक व्यवसाय करणे ही मुश्किल झाले आहे .. एक सुजाण नागरिक  म्हणून आपली काय जबाबदारी हवी हे जरी या शोषिकांना कळलं तरी ठीक नाही तर आणखी किती जणांचा बळी जाईल याची काही खात्री नाही .सोशल  मीडियाचे फायदे खुप आहेत आणि ते वापर करण्याऱ्या वर अवलंबुन आहेत ...नाहीतर चाललंय आपलं आली पोस्ट की मार रट्टा. 

श्री .संत दामाजी महाविद्यालयात इतिहास मंडळाची स्थापना .."

श्री .संत दामाजी महाविद्यालयात इतिहास मंडळाची स्थापना .."

श्री .संत दामाजी महाविद्यालयातील इतिहास विभागामध्ये इतिहास मंडळाची स्थापना करण्यात आली .प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विकास कदम उपस्थित होते तर अध्यक्ष   स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. पवार सर होते .प्रा. विकास कदम यांनी इतिहासाची आधुनिक युगाला कशाप्रकारे आवश्यकता आहे हे विविध उदाहरण वरून स्पष्ट केले .तसेच स्पर्धा परीक्षा दृष्टीने इतिहास विषयचे महत्त्व यावरही  संक्षिप्त आढावा घेतला .कार्यक्रमच्या  अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य .पवार सरांनी संशोधनातुन इतिहासाचे महत्त्व विषद करत विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात संशोधानात्मक वृत्ती वाढावी याकडे लक्ष देन्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले .प्रास्ताविक मध्ये इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक माने यांनी इतिहास विभागाकडून शैक्षणिक वर्षभरातील कार्यकम ची व इतिहास  विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती सांगितली.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्वेता मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.सुप्रिया पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी प्रा. डॉ. जावेद तांबोळी ,प्रा.महेश घाडगे ,प्रा.अमर माने ,प्रा.सौ.माने मॅडम, प्रा.श्रीराम पवार यांनी परिश्रम घेतले .



SURAJ GHULE

Kavita

Wednesday, August 15, 2018

७२ वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयात उत्साहात साजरा

महाविद्यालयात राष्ट्र ध्वजास मानवंदना करीत असताना   

श्री विद्या विकास मंडळाचे प्रतिनिधी मा.बालकिशन मर्दा.

उपस्थित विद्यार्थी 

 ७२ वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.  ध्वजारोहण प्रसंगी श्री विद्या विकास मंडळाचे समन्वयक मा. राहुलजी शहा , संस्थेचे सचिव मा.किसन (मामा) गवळी, प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, मा.श्री यादव आवळेकर. मा.डॉ.सुरवसे  आणि अन्य संस्था प्रतिनिधी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित.

Inauguration of English literary association & Galaxy Wall Poster.


Ours chief Guest Prof . Rajkumar Kadam  

Inauguration of English literary association 


Inauguration of  Galaxy Wall Poster

Friday, August 10, 2018

वाङ्मय मंडळ उद्घाटन २०१८-२०१९

श्री संत दामाजी महाविद्यालयात आज दिनांक ११ ऑगस्ट २०१८ रोजी वाङ्मय  मंडळाचे उद्घाटन   संपन्न होत आहे.

वाङ्मय  मंडळ उद्घाटन २०१८-२०१९ 

वाङ्मय  मंडळ उद्घाटन प्रसंगी स्वागत रांगोळी 

Thursday, August 9, 2018

सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन

१ ऑगस्ट २०१८
सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्ताने महाविद्यालयात उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्था प्रतिनिधी.
मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी 

ध्वजारोहण 

उपस्थित विद्यार्थी 

ध्वजारोहण 


प्राचार्यांचा संदेश

स्वर्गीय रतनचंद शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी 17 जुलै 1978 रोजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयात कला व वाणिज्य विभाग  आहेत. गेल्या चाळीस वर्षांच्या कालखंडात महाविद्यालयाने विविध शैक्षणिक टप्पे पूर्ण केले आहेत. यामध्ये महाविद्यालयातील  विद्यार्थी, माजी विद्यार्थी, मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण प्रेमी, श्री विद्या विकास मंडळाचे पदाधिकारी, सभासद, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने महाविद्यालयाने यशाचा आलेख उंचावत ठेवलेला आहे. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत. मराठी, अर्थशास्त्र, इंग्रजी विषयात सोलापूर विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळवलेले आहे. महाविद्यालयाचा क्रीडा विभाग कार्यक्षम असल्यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने हाती घेतले जातात. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने आजपर्यंत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, व्याख्यानमाला, श्रमसंस्कार शिबिर, स्वच्छता, महिला आरोग्य तपासणी आणि जनजागृती इत्यादी संदर्भात उल्लेखनीय काम केलेले आहे. महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये कला,
वाणिज्य आणि शास्त्र विभागाचा समावेश होतो. महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ विभागातील शास्त्र विभागातून अनेक विद्यार्थी मेडिकल व इंजिनीअरिंगला प्रवेश मिळविलेला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र महाविद्यालयात सुरू असून त्यामध्ये जवळपास ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आजपर्यंत इतिहास, इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयाच्या परिषदांचे आयोजन करण्यात  आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयांमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे स्पोकन इंग्लिश, अंगणवाडी बालवाडी सेविका कोर्सेस, tally कोर्स सुरू आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये इंग्लिश लँग्वेज लॅब, कॉम्प्युटर लॅब, inflibnet, वर्चुअल क्लासरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, प्लेसमेंट  कॅम्प  इत्यादी आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना  उपलब्ध  करून देण्यात आले आहेत.

श्री.संत दामाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सूवर्ण पदक

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत श्री....