श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय आणि शिर्के मॅटरनिटी होम यांच्या
संयुक्त विद्यमाने श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेची थीम “कम्प्रेशन ओनली लाइफ सपोर्ट” ही होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री राहुल शहा (चेअरमन, रतनचंद शहा बँक) यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सौ मंजुषा शहा( भुलतज्ञ सोलापूर) यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कम्प्रेशन या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर कुरुलकर, डॉ. शाकिर सय्यद, डॉ. मुकुंद महाजन, डॉ. शरद शिर्के, डॉ. एस के मर्दा. आणि डॉ. आर .एम. जाधव, डॉ.विवेक निकम हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन.बी पवार यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , कार्यालयीन कर्मचारी आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे तांत्रिक सहाय्य प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी, डॉ. जावेद तांबोळी आणि प्रा.शब्बीर शेख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गवळी डी.बी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एन.आर जगताप यांनी केले.
कार्यक्रमाची निवडक क्षणचित्रे
 |
"कम्प्रेशन ओनली लाइफ सपोर्ट" या कार्यक्रमाचे उद्घाटन करीत असताना मा.राहुलजी शहा, मा.किसन गवळी(मामा), मा. रमेश जोशी (वकील साहेब), डॉ.एन.बी.पवार(प्राचार्य), डॉ.प्रीती शिर्के, डॉ.शरद शिर्के,डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. शाकिर सय्यद अन्य पाहुणे.
 |
| कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.सौ.प्रीती शिर्के |
|
 |
| कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी वर्ग |
 |
| डॉ.मंजुषा शहा मार्गदर्शन करीत असताना |
 |
| कार्यक्रमास उपस्थित वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग |
 |
| कम्प्रेशनचे प्रात्यक्षिक सादर करीत असताना डॉ. राजेंद्र जाधव व डॉ.मंजुषा शहा |
 |
| डॉ,एन.बी,पवार मार्गदर्शन करताना |
 |
| विद्या विकासचे समन्वयक मा. राहुल शहा यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करताना मा.डॉ.शरद शिर्के. |
No comments:
Post a Comment