Wednesday, September 5, 2018

दामाजी महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न

श्री संत  दामाजी  महाविद्यालयात `गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।  गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`या उक्तीप्रमाणे  आज ५ सप्टेंबर निमित्ताने शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे  आयोजन मोठ्या आनंदाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन गुरु विषयक असणारा आदर या प्रसंगी व्यक्त केला. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी श्री विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष मा.बाबासाहेब पाटील, सचिव, मा.किसन(मामा) गवळी, मा. रमेश जोशी(वकील साहेब) हे उपस्थित होते, त्याच बरोबर प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, कोकरे  सर, गायकवाड सर, प्रा.एच.आर.नागटीळक, प्रा.एन.आर.जगताप, प्रा.कसबे डी.एस. व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.  शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे.  उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. असा विचार मा.जोशी वकील यांनी व्यक्त केला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.   शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही. जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. युनेस्कोनं ५ ऑक्टोबर हा आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केलाय. पण, भारतात मात्र राधाकृष्ण यांच्या सन्मानार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६२ साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. ‘माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे’ असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं होतं. या कार्यक्रमाचे आयोजन बी.कॉम  भाग दोन मधील विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पुजारी यांनी केले तर आभार कु.प्रणिती दत्तू हिने  केले.


No comments:

Post a Comment

श्री.संत दामाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सूवर्ण पदक

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत श्री....