श्री .संत दामाजी महाविद्यालयात इतिहास मंडळाची स्थापना .."
श्री .संत दामाजी महाविद्यालयातील इतिहास विभागामध्ये इतिहास मंडळाची स्थापना करण्यात आली .प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विकास कदम उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. पवार सर होते .प्रा. विकास कदम यांनी इतिहासाची आधुनिक युगाला कशाप्रकारे आवश्यकता आहे हे विविध उदाहरण वरून स्पष्ट केले .तसेच स्पर्धा परीक्षा दृष्टीने इतिहास विषयचे महत्त्व यावरही संक्षिप्त आढावा घेतला .कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य .पवार सरांनी संशोधनातुन इतिहासाचे महत्त्व विषद करत विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात संशोधानात्मक वृत्ती वाढावी याकडे लक्ष देन्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले .प्रास्ताविक मध्ये इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक माने यांनी इतिहास विभागाकडून शैक्षणिक वर्षभरातील कार्यकम ची व इतिहास विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती सांगितली.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्वेता मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.सुप्रिया पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. जावेद तांबोळी ,प्रा.महेश घाडगे ,प्रा.अमर माने ,प्रा.सौ.माने मॅडम, प्रा.श्रीराम पवार यांनी परिश्रम घेतले .



No comments:
Post a Comment